क्राईम

कापूरहोळ-सासवड एसटी बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून ३ लाख ३६ हजार ५०० रूपयाचे दागिने व रोकड लंपास


कापूरहोळ : रविवार २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान कापूरहोळ-सासवड प्रवासात एसटी बसमध्ये चढत असताना पुरंदरमधील महिलेचे ३ लाख ३१ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम ५५०० रुपयाच्या चोरी प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत प्राप्त माहिती नुसार कापूरहोळ (ता.भोर) चौकातून सासवड एसटी बसने संगीता बाळासो काकडे वय ५२ वर्ष राहणार पांगरी, तालुका पुरंधर, जिल्हा पुणे या प्रवास करीत असताना त्यांच्या पर्समधील पाकिटात असलेली मोहनमाळ व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना प्रवासादरम्यान घडली असुन पुढील प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार खरात तपासी अंमलदार पोलीस हवलदार मदने करत आहेत.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!