भरधाव कंटेनरची कारला धडक ; राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
नसरापूर : पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नसरापूर गावच्या हद्दीत देगाव फाट्यासमोर शनिवारी कंटेनर आणि कार अपघात झाला. या अपघातात भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर (MH 46 BU 1863) ने कारला (MH 09 GU 334) पाठीमागच्या उजव्या बाजूस जोरात धडक दिली. या धडकेची तीव्रता एवढी जोरात होती की कार रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकून अपघात झाला.
कारमध्ये फिर्यादी प्रवीण सर्जेराव पाटील वय 35 वर्ष राहणार दरेवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांच्यासह त्यांचे आई वडील व मुलगी असे चार जण प्रवास करत होते त्यातील काही जणांना किरकोळ व गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली असून कार गाडीचे नुकसान झालेले आहे तरी या अपघातास सर्वस्वी जबाबदार कंटेनर चालक असल्याने त्याच्यावर राजगड पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर नंबर 563/24 (B) BNS कलम 281, 125 (A), 125 (B) 324 (4) मो.वा.का.कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.




