कात्रजच्या मुख्य चौकातील उड्डाण पुलाचे सेगमेंटल लॉचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असुन पर्यायी मार्गाचा वापर करावा : पुणे वाहतुक पोलीस उपआयुक्त
पुणे : पुणे शहरात कात्रज चौकामध्ये उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे कात्रज चौकात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे.याकरीता महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही. ९.०१९६/८७१/ सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (२) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मी अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर, दिनांक ०३/१२/२०२४ रोजी पासुन पुढील आदेशापर्यंत कात्रज चौक परिसरातील वाहतूकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगीक तत्वावर बदल करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द समजण्यात येतील.
कात्रज चौकामध्ये उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे खालील नमुद रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात येत आहे. अ) जड / अवजड वाहने (डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्हेईकल्स, हेवी गुड्स मोटार व्हेईकल्स, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल, वाहने)
१) सातारा कडुन जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुल येथे प्रवेश बंद राहील.
२) साताऱ्या कडुन नविन बोगदा मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील
३) मुंबई कडुन वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील
४) सोलापुर कडून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील
५) सासवड कडून मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील
६) बोपदेव घाट कडुन कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडी मशिन चौक पुढे प्रवेश बंद राहील
७) मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील
८) स्वारगेट कडुन कात्रज मार्गे साताऱ्या कडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील
(सुचना: वरील मार्गावरील जड / अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळी जावे.) टिप मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री १०.०० वा. ते ०४.०० वा,दरम्यान प्रवेश चालु राहील परंतु त्यांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील.
ब) एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे आदेश
१) मुंबई कडुन वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या एस. टी. बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील
२) साताऱ्या कडुन स्वारगेट कडे येणाऱ्या एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांनी नवले पुलाखालुन उजवीकडे वळण घेवुन कात्रज येथुन स्वारगेट कडे जावे.
(टिप: सिंहगड रोड वरील एस. टी. बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांमुळे होणारी वाहतुक कॉडी टाळण्यासाठी वरील मार्गाचा वापर करावा)
क) मांगडेवाडी, दत्तवाडी, हांडेवाडी व कात्रज परिसरातील नागरिकांनी स्वारगेट कडे जाण्यासाठी शक्यतो कात्रज चौका कडे न जाता इतर उपलब्ध पर्यायी मार्गाचा जास्तीत जास्त वापर करावा असे आव्हानं पुणे वाहतुक शाखा पोलिस उपआयुक्तांनी केले आहे.




