ताज्या घडामोडी

कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गट ! पंचायत समिती गणातून इच्छुकांच्या नवरात्रोत्सवानिमित्त भेटीगाठी वाढल्या !! राजकीय रणसंग्रामाचे पडघम


 

कापूरहोळ : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांचे बिगुल वाजल्याने कामथडी-भोंगवली गटामध्ये इच्छुकांनी कसली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या नवीन प्रारूप यादीनुसार या गटात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाला असून नव्या गणरचनेमुळे अनेकांचे राजकीय गणित बदलले आहे.

कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटामध्ये कामथडी, करंदी खे.बा., उंबरे, या तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. या तीन गावामधील मतदानावर सर्व इच्छुकांचा डोळा असणार आहे. या गटातून इच्छुकांनी जोरदार जनसंपर्क मोहीम उघडली असून गावोगावी बैठका सामाजिक उपक्रम आणि विविध मंचांवरून आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रीय असलेले अनेक नवे-जुने चेहरे आता थेट गट पातळीवर आपल्या ताकदीची चाचपणी करू लागले आहेत. पाणी, रस्ते, शौचालये, पथदिवे, महिला बचत गटांना सुविधा अशा स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवत ‘लोकांसोबत सतत’ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे.

• कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटाकरिता इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) मा.जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, मा.भोर पंचायत समिती उपसभापती विक्रम खुटवड, भारतीय जनता पार्टीचे पत्रकार वैभव धाडवे पाटील, महेश टापरे, लहू शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार)  गणेश खुटवड, शिवसेना पक्षाचे (एकनाथ शिंदे) प्रफुल्लभैया धुमाळ,

Advertisement

• कामथडी पंचायत समिती गणात इच्छुकामध्ये शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडून आदित्य बोरगे, भारतीय जनता पार्टी कडून धनंजय इंगुळकर, पंकज गाडे, सुनील पांगारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) सौ वैशाली गाडे, शिवसेना (शिंदे गट) प्रफुलभैया धुमाळ, अमित गाडे, सागर पांगारकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) सौ.आरती धावले,

• भोंगवली पंचायत समिती गणात इच्छुक उमेदवारांमध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे रोहन बाठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) पक्षातर्फे गणेश निगडे, मनोज निगडे, शिवसेना (शिंदे गट) किशोर बारणे, शुभम शेखर शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) भरत बोबडे,

नव्या रचनेत गावांची नव्याने मांडणी झाल्याने मतदारसंघांचे बलकाट बदलले असून याचा थेट फायदा आणि तोटा काही इच्छुकांना होणार आहे. त्यामुळे अनेकांनी रणनीतीत बदल करत नव्या गणरचनेनुसार मांडणी सुरू केली आहे. इच्छुकांची ताकद आणि जनाधार यांचा बारकाईने आढावा घेतला जात आहे. इच्छुकांच्या प्रचारात आता सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केलेला दिसून येतो आहे. आगामी निवडणुकीत येथे रंगतदार लढत पाहायला मिळणार हे निश्चित!

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!