ताज्या घडामोडी

स्वयंदीप फाउंडेशनचा अनोखा उपक्रम : भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप


 

वेळवंड  : भोर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वेळवंड खोऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला होता.

मौजे वेळवंड गावच्या पंचशील नगर येथे पार पडलेल्या या उपक्रमात बारे ते सांगवी (वेळवंड खोरे) परिसरातील इयत्ता पहिली ते पंधरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, स्टेशनरी साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात भक्कम आधार मिळावा म्हणुन दर वर्षी अशा उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत असते.

Advertisement

या कार्यक्रमात स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मानसी वानखेडे, बार्टी पुणेच्या प्रकल्प अधिकारी सुनंदा गायकवाड व वाघोलीच्या सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी वाघमारे यांनी कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वांनी आपल्या भाषणात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सातत्याने शैक्षणिक सहाय्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या वेळी वर्षा चौरे, रमाताई आठवले, रिना सोनवणे या महिला भगिनीची उपस्थिती लाभली होती.

स्थानिक पोलीस पाटील दगडू कांबळे यांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणात म्हटले स्वयंदीप फाउंडेशनचे हे दातृत्व विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणेल असुन भविष्यातही अशीच जास्तीत-जास्त गरजु विद्यार्थ्यांना मदत लाभावी ही अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, शिक्षकवृंद व स्वयंसेवकांनी सहकार्य केले, सामाजिक भान जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम भोर तालुक्यात प्रेरणादायी ठरत असुन वेळवंड खोऱ्यातील नागरिकांकडून हा उपक्रम राबवणाऱ्या स्वयमदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच इतर सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!