ताज्या घडामोडी

भोरच्या कापूरहोळ गावात मुळशीतील व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या


 

कापूरहोळ : भोर तालुक्यातील पुणे- बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या कापूरहोळ गावच्या ट्रॉफीक पोलिस चौकीच्या बाजुला अमित कुंभार यांच्या पडीक बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माजल्यावर गणेश प्रकाश भोकरे वय 43 वर्ष राहणार पौड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार दिनांक 17/07/2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कापूरहोळ गावचे पोलीस पाटील सय्यद शेख यांनी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली, अमित कुंभार यांची पडीक आसलेल्या बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर एक अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असे सांगितले असता काही वेळात त्याठिकाणी पोलिस अधिकारी गेले असता एक व्यक्ती हा पिवळ्या नायलॉनच्या दुरीने तिसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन लटकत होता तिथे जमलेल्या लोकांच्या मदतीने सदर इसमास खाली घेऊन सिद्धिविनायक हॉस्पिटल कापूरहोळ येथे पाठवले असता त्यावेळी तेथील डॉक्टरानी त्या व्यक्तीस तपासले असता तो तपासणी पूर्वीच रात्री 08:00 वाजता मयत झाल्याचे घोषित केले.

Advertisement

पोलिसांनी सदर व्यक्तीची ओळख पटवण्याकरिता त्याच्या अंगावरील कपड्याची पाहणी केली असता त्यांचा शर्टच्या खिशामध्ये गणेश प्रकाश भोकरे राहणार भोईआळी, पौड, ता.मुळशी, जि.पुणे या पत्याचे आधारकार्ड नंबर 677367669498  मिळाले असता त्यावरून सदर व्यक्तीचा आधार कार्ड वरील फोटो व त्याचा चेहरा हा एकच असल्याची खात्री झाली असुन सदर मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी नाना मदने सो करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!