शिंदेवाडीतील हॉटेल आमराईसमोरून यामाहा कंपनीची MT-15 मोटारसायकल लंपास
खेडशिवापूर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी येथे हॉटेल आमराईसमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली सुमारे ६० हजार रुपये किमतीची यामाहा कंपनीची MT-15 मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री १२.२० ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. आकाश आबा बाबर (वय २६, सध्या रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांच्या सासऱ्यांच्या मालकीची हिरव्या रंगाची यामाहा MT-15 (क्रमांक एमएच ४२ बीटी ०८४५) मोटारसायकल हॉटेल आमराईसमोर उभी होती. अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने ती चोरून नेली.
याप्रकरणी बाबर यांनी १० नोव्हेंबर रोजी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुंढे पुढील तपास करीत आहेत.




