ताज्या घडामोडी

मळणी यंत्रात डोक्याला बांधलेला स्कार्प अडकुन शेतमजुर महिलेचा मृत्यू : भोर तालुक्याच्या केंजळ येथिल घटना


किकवी: सध्या खरीप हंगामातील पिकांचा मळणी हंगाम सुरू आहे. अनेक ठिकाणी ज्वारी, बाजरी पिकांच्या काढण्या पूर्ण झाल्या असून शेतकरीवर्गामध्ये पिकाची मळणी करण्याची लगबग सुरू आहे. मात्र या दरम्यानच भोर तालुक्यातील केंजळ गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. बाजरी मळणी करताना डोक्याला बांधलेला महिलेचा स्कार्प मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून ती जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली, सावित्रा पांडुरंग गायकवाड असे मृत महिलेचे नाव असून ही घटना शनिवार २६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता घडली.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार मयत महिला व तिचा पती पांडुरंग बाबुराव गायकवाड वय २८ वर्ष मुळचे जालना जिल्ह्यातील अंतरवाडी गावचे रहिवाशी असुन ५ वर्षापासून केंजळ येथिल शेतकरी मयूर चव्हाण यांच्या शेतात काम करून आपली उपजीविका भागवत होते. हे दोघेही बाजरी भरडत असताना खाली पडलेली कणसे गोळा करताना मृत महिलेच्या डोक्याचा बांधलेला स्कार्प व केस मळणी यंत्राच्या शाफ्टमध्ये अडकल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

राजगड पोलिसांना या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांच्याकडून देण्यात आली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळावर जाऊन पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या बाबतचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!