ताज्या घडामोडी

ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवासी मालमत्ता असणाऱ्या मालकांसाठी ‘गुड न्यूज’ ! घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती करावर ५०% सवलत


 

मुंबई : महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या निवासी मालमत्ताधारकांसाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करावर ५० टक्के सवलत देण्याचा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये वर्षानुवर्षी ग्रामपंचायत कर वसुली प्रलंबित राहिल्याने मोठी आर्थिक तंगी निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायतींना आवश्यक सेवा पुरवणे आणि विकासकामे राबवणे कठीण झाले होते. यामुळे थकबाकीची एकरकमी भरपाई होण्याच्या व विकासासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी शासनाने हा सवलतीचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

सरकारच्या या नवीन निर्णयानुसार २०२५-२६ च्या ग्रामपंचायत करांची पूर्ण रक्कम व १ एप्रिल २०२५ पूर्वीची थकबाकी मिळकतदारांनी ५०% प्रमाणात एकाच वेळी जमा केल्यास उर्वरित ५०% सवलतीच्या रूपात मंजूर केली जाईल. ही सवलत केवळ निवासी मालमत्तांवर लागू असून औद्योगिक, व्यावसायिक मालमत्तांना लागू असणार नाही असा ठराव करण्यात आला आहे.

हे अभियान ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत चालू राहील, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मुदत वाढल्यास ही सवलत तुम्ही पुन्हा येऊ शकता, महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतींना ही सवलत देण्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला आहे. ग्रामसभेत बहुमताने ठरवूनच हा लाभ देण्यात येईल. यामुळे उत्पन्न कमी होण्याच्या बाबतीत शासनाकडून कोणतीही भरपाई मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे थकबाकीची वसुली वाढेल आणि ग्रामपंचायतींचे विकास कार्यक्षेत्र गतीने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!