ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कामथडी ग्रामपंचायतीत ‘घनकचरा व्यवस्थापन घंटागाडी’चा शुभारंभ


 

कापूरहोळ (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील कामथडी हे गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ‘घनकचरा व्यवस्थापन’ या उपक्रमात सामील झाले असून, या उपक्रमाचा शुभारंभ कामथडी ग्रामपंचायतीत मोठ्या उत्साहात झाला. ग्रामपंचायतीतर्फे नवीन घंटागाडीचे उद्घाटन करण्यात आले आणि गाव स्वच्छतेकडे वाटचाल करण्याचा नवा अध्याय सुरू झाला.

सरपंच इंगुळकर यांनी या प्रसंगी सांगितले की, गाव स्वच्छ ठेवणे ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. त्यांनी ग्रामस्थांना सहकार्य आणि स्वच्छतेकडे सक्रिय सहभागासाठी आवाहन केले.या उपक्रमातून गावातील घरगुती तसेच व्यावसायिक कचरा दररोज नियमितपणे गोळा करून त्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन केले जाणार आहे. घंटागाडीच्या माध्यमातून प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जाणार असून, ‘स्वच्छ आणि निरोगी गाव’ या संकल्पाकडे हा टप्पा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Advertisement

कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आले. ‘स्वच्छ गाव सुंदर गाव’ हा संदेश देण्यासाठी गावात जनजागृती फलक, घोषवाक्ये आणि स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमामुळे कामथडी ग्रामपंचायत स्वच्छ, समृद्ध आणि आदर्श गाव बनविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे.

कार्यक्रमाला सरपंच नीता धनंजय इंगुळकर, उपसरपंच शरद  मांढरे, ग्रामपंचायत सदस्य गुलाब वाल्हेकर, माजी उपसरपंच नितीन इंगुळकर तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!