ताज्या घडामोडी

बनेश्वर वन उद्यानात मधमाशी पोळे जाळून काढले ! दोघां विरोधात गुन्हा दाखल


नसरापूर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील बनेश्वर वन उद्यानात १८ मार्च २०२६ रोजी रात्री अवैध प्रवेश करून मधमाशी पोळे जाळण्याची घटना घडली. बनेश्वर जंगल कक्ष क्र. ५०९ मध्ये बनेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल भा. गायवळ (रा. नसरापूर) यांच्या सूचनेने सायबू मारुती मुकणे (रा. वाघजवाडी, किकवी, ता. भोर) व इतर मजुरांनी विनापरवाना प्रवेश करून आगीच्या मदतीने मधमाशी पोळे काढले.

Advertisement

वन परिक्षेत्र अधिकारी नसरापूर यांच्या अखत्यारीत सदर कारवाई करण्यात आली असून, आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. जा. क्र./गुन्हा/८९०/२०२५-२६. पुढील तपास परीमंडळ वन अधिकारी विद्या पवार करीत आहेत. वन संरक्षणासाठी वन विभागाने कठोर पावले उचलली असून, अशा प्रकारांना पायबंद घालण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!