क्राईम

महिला सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला : राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


कापूरहोळ : भोर तालुक्याील निगडे गावच्या सरपंचांच्या पतीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आसून २ ऑगस्ट दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली,याबाबत सरपंच नाजुका बारणे व त्यांचे पती किशोर बारणे (वय ४१ वर्ष) यांनी दोघांच्या विरोधात राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंचांचे पती किशोर बारणे गावात येत असताना अचानक आलेल्या आरोपींनी त्यांची गाडी थांबवली व कोयता, लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये गाडीचे नुकसान झाले असून आरोपीने फेकून मारलेला कोयता सुदैवाने त्यांच्या डोक्याला न लागता बाजूने गेला व पुढील अनर्थ टळला यावेळी अश्लील शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी आरोपींनी त्यांना दिली.

Advertisement

ज्ञानेश्वर चिकणे व प्रथमेश चिकणे या दोघा जणांवर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घडलेल्या घटनेनंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते,यावेळी ग्रामस्थांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गवळी  यांच्या मार्गदर्नाशनाखाली पोलिस हवलदार नाना मदने करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!