ताज्या घडामोडी

स्पर्श सेतू संस्थेच्यावतीने न्हावी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम संपन्न


सारोळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावी ता.भोर, जि.पुणे येथे स्पर्श सेतू संस्थेच्यावतीने सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत एकूण 111 विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेटी,पेन, पेन्सिल,खोडरबर, चित्रकला वही, रंगपेटी इत्यादी शालेय साहित्य वाटण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष महेश यादव आणि उपाध्यक्ष भागवत बोराडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच शिक्षकवृंदांचे कौतुकही केले.
विशेष म्हणजे,अध्यक्ष महेश यादव यांनी 2026-27 या आगामी शैक्षणिक वर्षात शंभर टक्के विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे, शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी अनिल चाचर यांचे विशेष प्रयत्न या उपक्रमामागे यशस्वी ठरले.
शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षकवृंद व पालकांनी स्पर्श सेतू संस्थेच्या उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली पिसाळ यांनी केले.सूत्रसंचालन सोनाली बोन्द्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप मोरे यांनी केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!