ताज्या घडामोडी

PSI निलेश पाटील यांची औंधमध्ये गोळी झाडून आत्महत्या ! पोलीस दलात खळबळ


पुणे : पुण्यातील औंध परिसरात पोलीस उपनिरीक्षक (PSI) निलेश भाऊसाहेब पाटील यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. निलेश पाटील हे पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असून सध्या त्यांची नेमणूक विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात होती.

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास औंध परिसरात ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या निलेश पाटील यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

निलेश पाटील यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, कामाचा ताण, वैयक्तिक अडचणी अथवा अन्य कोणते कारण यामागे आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून आवश्यक पुरावे व माहिती संकलित केली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून घटनेच्या सर्व अंगांनी तपास सुरू असून कुटुंबीय, नातेवाईक आणि सहकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!