राजगड पोलिसांची पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी : तांत्रिक पद्धतीने गहाळ झालेला ऐवज शोधून काढला
नसरापूर : राजगड पोलीस स्टेशनची पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी गहाळ झालेला ऐवज ५ तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र १ मोबाईल फोन व रोख रक्कम ३,००० रु.मुळ मालकास काही तासांतच परत केला आहे,
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार रंजना रविद्र पाटील रा. शिगाव ता.वाळवा जि. सांगली यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजता येउन कळविले की दि. २६ जुलै २०२५ रोजी रात्री १०.०० वाजता शिगाव ता. वाळवा जि. सांगली-सांगोला पुणे असा कारने प्रवास करत असताना रात्री नक्की वेळ माहित नाही कारचे डिक्कीतील पर्स ही प्रवासा दरम्यान कोठेतरी पडुन गहाळ झाली होती, राजगड हॉटेल केळवडे ता. भोर जि. पुणे येथे असताना त्यांच्या लक्षात आले की कारचे डिक्कीमध्ये पर्स नाही.
सदर घटनेची माहिती राजगड पोलिस ठाणे अंमलदार पो. हवा/२३२० नाना मदने व पोलीस अंमलदार म.पो.शि. मांगले यांना सांगितली असता त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये ऐवज गहाळ नोंद करुन घेण्यात आली, आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन याबाबत पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना माहिती देऊन गहाळ मालमतेचे काम पाहणारे पो.शि./२९२० नलावडे यांना कळविली असता तांत्रिक तपासाद्वारे असे समजले की बॅगेतील मोबाईलचे लोकेशन हे सांगोला येथील असल्याने मोबाईलच्या लोकेशनवर गोपनीय बातमीदारास पाठवण्यात आले त्यास एक पांढ-या हिरव्या रंगाची पर्स त्यामध्ये १ सॅमसंग कंपनीचा मोबाईल ५ तोळे सोन्याचे गंठण व रोख रक्कम ३,००० रू मिळून आले. त्याने त्या बॅगेचा व बॅगेमधील ऐवजाचा व्हिडीओ काढून तक्रारदारांना दाखविली असता त्यांनी बॅग व बॅगेतील सोने मोबाईल ओळखुन बॅग त्यांचीच असल्याचे सांगितले.
त्यानुसार राजगड पोलीस स्टेशन कडील गहाळ रजिस्टर नंबर २२५/२०२५ मधील अंदाजे ५,५०,०००/- हजार रू चे ५ तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र व २५,००० रू किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल तसेच रोख रक्कम ३,००० रू मिळुन आल्याने गहाळ झालेली मालमत्ता तक्रारदार यांच्या ताब्यात दिली असता तक्रारदारांनी आनंद व्यक्त करून पोलीसांना पेढे भरवुन पोलीसांचे आभार मानले आहेत.
सदरची कामगीरीही मा.पोलीस अधिक्षक सो.संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड तानाजी बरडे, राजगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेश गवळी याचे मार्गदर्शनाखली राजगड पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपिनिरीक्षक अजित पाटील, महिला पोलीस अंमलदार पुनम मांगले, पोलीस अंमलदार नाना मदने, मयुर निंबाळकर, अक्षय नलावडे, मंगेश कुभांर, अजय चांदा या पोलिस अधिकाऱ्यांनी केलेली आहे.




