ताज्या घडामोडी

भोर शहरात अभ्यासिका व वाचनालयासाठी 2.65 कोटींचा निधी मंजूर


भोर : शहर व तालुक्यातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आधुनिक अभ्यासिका व वाचनालय बांधण्याचे काम आमदार शंकर भाऊ मांडेकर व नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे यांनी हाती घेतले असून, यासाठी 2.65 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम भोर एसटी स्टँडजवळील दीक्षाभूमी स्मारक शेजारील रिकाम्या जागी होणार आहे.

या उपक्रमाला तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, पक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला. भोर नगर परिषदेच्या लोककल्याणकारी योजनांना समाज म्हणून पूर्ण सहकार्य देण्यास कटिबद्ध असल्याचे निवेदनाद्वारे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभ्यासिकेतून भोर शहर व तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन नवीन प्रशासकीय अधिकारी घडतील, अशी अपेक्षा आहे.

Advertisement

या वेळी विकासजी निकम (भिवंडी निजामपूर महानगरपालिका सभागृह नेते, RPI एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष), कश्यप दादा साळुंके (दीक्षाभूमी स्मारक समिती कार्याध्यक्ष), अशोक शिंदे (भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा सचिव), अविनाश गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय अध्यक्ष), राजन घोडेस्वार (दीक्षाभूमी स्मारक समिती उपखजिनदार), महेंद्र सपकाळ (भोर तालुका बौद्धजन संघ अध्यक्ष), प्रमोद भालेराव (वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष) तसेच अर्जुन शेलार, लक्ष्मण गायकवाड, शरद गायकवाड, निलेश घोडेस्वार, मानस जाधव, किशोर अमोलिक, मयूर गायकवाड, अरूण रणखांबे, रणजीत रणखांबे, स्वप्निल सावंत, चेतन कांबळे यांसारखे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!