“फुलपाखरू रंग काळजाशी भिडलेला” कादंबरीस महाराष्ट्र शासनाचे अनुदान ! गाव-शहर हृदयस्पर्शी प्रेमकथेवर आधारित !! राज्यभरातून कामगार लेखक अमोल सोंडकर यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव
पुणे : तांभाडच्या डोंगर कुशीतून उदयाला आलेल्या कामगार लेखक अमोल रामदास सोंडकर यांची कादंबरी “फुलपाखरू रंग काळजाशी भिडलेला” यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई यांनी सन २०२५–२६ च्या साहित्य प्रकाशन अनुदान योजने अंतर्गत १०,०००/- रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. जावक/क्रां. मका/प्रजवि/२०२६/९३ या निर्णयान्वये दि. १८/०३/२०२६ रोजी हे अनुदान दिले गेले. ग्रामीण मातीतील संवेदनशील लेखणीला मिळालेली ही शाबासकी लेखकासाठी अत्यंत अर्थपूर्ण ठरली आहे.
अमोल सोंडकर हे सध्या पुणे जिल्हा सहकारी दूध संघ, कात्रज येथे वैरण विकास विभागाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तांभाड (ता. भोर) येथील ग्रामपरंपरेतून उत्पन्न झालेली ही त्यांच्या दुसरी कादंबरी आहे; यापूर्वी ‘रुबाब’ या कादंबरीद्वारे त्यांनी वाचनिक विश्वात स्थान मिळवून दिले आहे.
“फुलपाखरू रंग काळजाशी भिडलेला” च्या मुखपृष्ठावरूनच पुस्तकाचा भाव व कथानक उमटते गावातील निसर्गरम्य जीवन, शाळकरी काळातील निरागस प्रेम आणि शहरातील व्यावसायिक कसोट्यांमधून नात्यांचे घट्ट बांधणीपर्यंतचा प्रवास. कथा शहर व गाव, आधुनिकते व संस्कृती यांच्यातील सेतु बांधून प्रेमाला समर्पित आहे.
कादंबरीचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे दि. १६ मार्च २०२५ रोजी ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी व सु. ल. खुटवड यांच्या शुभहस्ते पार पडले. अनुदानाबद्दल सोंडकर यांनी महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
संपर्क : अमोल रामदास सोंडकर.
वैरण विकास विभाग उपप्रमुख.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज.
फोन : ९९२२७४९०७४
ई-मेल : amolsondkar.2012@gmail.com




