ताज्या घडामोडी

भोरचा ‘सिंघम’ कोण ? ! आवारे की जगताप !! १८ दिवसांची प्रतिक्षा उद्या संपणार


भोर : दि. २० डिसें.(शनिवार) भोर नगरपरिषदेच्या निवडणुकसाठीचे मतदान २ डिसेंबर रोजी अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडले असून आता सर्वांच्या नजरा उद्या म्हणजेच रविवार २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मत मोजणीकडे लागल्या आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार याची कमालीची उत्सुकता संपूर्ण शहरासह भोर तालुक्यात निर्माण झाली आहे.

भोर नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अटीतटीच्या लढतीने राजकारणाचा पारा शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र आवारे आणि भाजपचे संजय जगताप यांच्यात थेट लढत रंगली असून कोण बनेगा भोरचा ‘सिंघम’ याकडे नागरिक उत्सुकतेने डोळे लावून बसले आहेत.

भोरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला. विद्यमान आमदार शंकर मांडेकर (राष्ट्रवादी) यांनी भोरमध्ये तळ ठोकून प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली रामचंद्र आवारे यांना विकास आणि सामाजिक कामांचा मुद्दा घेऊन पाठिंबा मिळाला आह़े.
दुसरीकडे माजी आमदार संग्राम थोपटे (भाजप) यांनी प्रतिष्ठेसाठी झुंज दिली आह़े, भाजप प्रवेशानंतर त्यांनी विकासाचा अजेंडा राबवला असुन राजगड कारखान्याला मोठा निधी मिळवल्याने शेतकऱ्यांकडुन त्यांचे कौतुक होत आह़े. निवडणुकीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘गोल्डन सभा’ त्यांनी मिळवली होती ज्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आह़े.

Advertisement

राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली ज्यामुळेही भोर राष्ट्रवादीमध्ये नवचैतन्य संचारले होते, यावेळी पक्षाने विकासाचे राजकारण राबवले. रामचंद्र आवारे यांचे दैनंदिन विधायकी आणि सामाजिक काम लोकप्रिय आहे.
संजय जगताप यांना शहरातील भाजपमय वातावरण पोषक ठरेल, असा विश्वास आहे. दोन्ही उमेदवारांनी विकासाचे आश्वासन दिले. राष्ट्रवादीने गेल्या काळातील कामांचा निधी दिला आह़े तर सत्ताधारी भाजपने मोठा निधी आणून भोरचा विकास घडवणार, असे सांगितले आह़े.

आजी-माजी आमदारांची प्रभावाची लढाई -:
• शंकर मांडेकर (विद्यमान आमदार, राष्ट्रवादी) भोरमध्ये तळ ठोकून प्रचार करत होते. स्थानिक पातळीवर मजबूत पकड, विकास आणि सामाजिक कामांवर भर दिल्याने रामचंद्र आवारे यांना जनतेचा पाठिंबा मिळाला आह़े.

• संग्राम थोपटे (माजी आमदार, भाजप ) भाजप प्रवेशानंतर राजगड कारखान्याला निधी मिळवला. शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीसांची ‘गोल्डन सभा’ मिळवली. संजय जगताप यांच्या प्रचारात प्रतिष्ठा पणाला लागली आह़े.

नगरसेवकांऐवजी नगराध्यक्ष कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालानंतर भोरच्या विकासाच्या दिशेने नवे पाऊल पडेल, आजी-माजी आमदारांच्या प्रभावाने ही लढत जिल्हास्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!