ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील ५ गावांचे सरपंच बिनविरोध ! उर्वरित २ गावच्या सरपंच पदाकरिता निवडणूक


भोर : भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीने राजकीय वातावरण तापले होते. यात सरपंचपदाच्या ९ आणि सदस्यपदाच्या ३४ अशा एकूण ४३ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र, पाच ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडले गेले, तर दोन ठिकाणी सरपंचपदासाठी निवडणूक लागली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण कदम यांनी ही माहिती दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ ते १३ एप्रिलदरम्यान नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली. सरपंच व सदस्यपदासाठी एकूण २२ अर्ज दाखल झाले. सोनवडी, शिरवली तर्फे भोर, परहर बुद्रुक, करंदी खुर्द, आपटी या पाच ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले.

Advertisement

तसेच सांगवी बुद्रुक, वडतुंबी प्रभाग क्र. २, परहर बुद्रुक प्रभाग क्र. २, कांबरे खेबा येथील ४ सदस्यही बिनविरोध निवडले गेले. रावडी व खडकी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होणार असून, अंगसुळे येथील सदस्यपदाचीही निवडणूक लागली. सदस्य अर्जापैकी १ बाद झाला व ६ जणांनी माघार घेतली. दोन ठिकाणी सरपंच जागा रिक्त राहिल्या.

निवडणुकीसाठी प्रशासनाने ८ निवडणूक अधिकारी, १६ सहायक व ४८ राखीव कर्मचारी नेमले आहेत. २६ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त जागांची निवडणूक असताना मोजकेच अर्ज आल्याने सरपंच-सदस्य होण्यास नागरिकांची उदासीनता दिसून येते आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!