ताज्या घडामोडी

जनसेवा बँक सासवड शाखेचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ! कर्जमंजुरी पत्रांचे वितरण !! मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन


सासवड : जनसेवा बँक सासवड शाखेचा ३४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष रवी तुपे, क्लस्टर हेड जाधव, उद्योजक डॉ. निनाद खळदकर, नाना झुरंगे, सोमेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शाखेचे ग्राहक, सभासद, आजी-माजी सेवक, स्थानिक नगरसेवक तसेच परिसरातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी शाखेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. गेल्या ३४ वर्षांतील शाखेच्या वाटचालीसह ग्राहकाभिमुख सेवा, आर्थिक विकासातील योगदान आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रकाश टाकण्यात आला.

Advertisement

कार्यक्रमात कर्जवाटपाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. बाळासाहेब कामथे यांना ५० लाख रुपयांचे गृहकर्ज मंजुरीपत्र, सौ. शिर्के यांना ७ लाख रुपयांचे गृहकर्ज मंजुरीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच भानुदास जगताप यांना ३० लाख रुपयांच्या कर्जाचे तत्त्वतः मंजुरीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या सोहळ्यास सुमारे २५० ते ३०० खातेदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित ग्राहक, सभासद आणि हितचिंतकांचे आभार शाखा व्यवस्थापक दत्तात्रय गाडे यांनी मानले. शाखेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यच प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!