ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर ; कही खुशी, कही गम : अनेक इच्छुकांचा झाला भ्रमनिरास


भोर : गावगाड्यातील मिनी मंत्रालय आसलेल्या भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठीची सोडत बुधवार २३ एप्रिल २५ रोजी दुपारी १२ वाजता भोर शहरातील अभिजित मंगल कार्यालय येथे काढण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या गावाच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत आज प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन यांनी जाहीर केली. त्यामध्ये अनेक इच्छुकांना या आरक्षणाचा फटका बसला तर अनेक इच्छुक नव्या आरक्षण सोडतीमुळे जल्लोषात कामाला ही लागले आहेत.

सदर सोडती मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तालुक्यातील पुढील प्रमाणे १० गावांचा सरपंच पदासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले.

१) पसुरे २) आपटी ३) नाटबी ४) सारोळा ५) म्हसर बु. ६) आंबेघर ७) नसरापूर ८) आंबावडे ९) कापूरहोळ १०) करंदी बु.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पुढीलप्रमाणे ५ ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले.

१) तांभाड २) वागजवाडी ३) करंदी खेबा ४) येवली ५) माळेगाव

नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी पुढील प्रमाणे ४१ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे.

१) सांगवी हिमा २) शिंद ३) भुतोंडे ४) किकवी ५) नऱ्हे ६) राजापूर ७) माझगाव ९) शिरवली हिमा १०)  कोंढरी ११) मोहरी खुर्द ११) किवत १२) गोरड म्हसवली १३) धांगवडी १४) न्हावी-३२२ १५) म्हसर खुर्द १६) न्हावी-१५ १७) वर्वे बु.१८) कासुर्डी गुमा १९) हातनोशी २०) सांगवी बु. २१) नेरे २२) संगमनेर २३) हर्णस २४) ब्राह्मणघर २५) बसरापूर २६) राजघर २७) वारवंड २८) पऱ्हर खुर्द २९) बाजारवाडी ३०) कोर्ले ३१) कुंबळे ३२) बारे खुर्द ३३) कुरुंजी ३४) पिसावरे ३५) पऱ्हर बु. ३६) भावखेल ३७) गुढे निवंगण ३८) पेंजळवडी ३९) महुडे खुर्द ४०) कांबरे बु. ४१) हातवे खुर्द.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी पुढील प्रमाणे १०० ग्रामपंचायतचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.

Advertisement

१) वेळू २)भोलावडे ३)भोंगवली ४)वरवे खुर्द ५)शिंदेवाडी ६)काळी ७)चिखलगाव ८)मोहरी बुद्रुक ९)मोरे बुद्रुक १०)राजे ११)वेनवडी १२)कांबळे  १३)रायरी १४)ससेवाडी १५)उंबरे १६) गवडी १७) मळे १८) म्हाळवडी कर्णवडी १९) इंगवली २०) चिखलावडे २१) आळंदे २२) करंजे २३) हिर्डोशी २४) पोम्बडी २५) दपकेघर २६) सावरदरे २७) आळंदीवाडी २८) वाटारहिंगे २९) टापरेवाडी ३०) धावडी ३१)  सांगवी खुर्द ३२) गुंणद ३३) विरवाडी ३४) भाबवडी ३५) पांगरी ३६)  शिरवली-भोर ३७) वाढाणे ३८) खडकी ३९) वरोडी बु. ४०)  नायगाव ४१) जोगवडी ४२) कोळवडी ४३) शिरगाव ४४) करंजगाव ४५) आशिंपी ४६) उत्रोली ४७) वडगाव डाळ ४८) खोपी ४९) देगाव ५०) गोकवडी ५१) केळवडे ५२) कामथडी ५३) शिवरे ५४) खानापूर ५५) हातवे बु. ५६) केंजळ ५७) कुसगाव ५८) वडतुंबी ५९) कर्नवडे ६०) अंबाडे ६१) निगडे ६२) कुरुंगवडी ६३) टिटेघर ६४) दिवळे ६५) नांदगाव ६६) नाझरे ६७) कांजळे ६८) जांभळी ६९) मोरवाडी ७०) अंगसुळे ७१) जयतपाड ७२) वाटार हिमा ७३)  हरिश्चंद्री ७४) बालवडी ७५) निगुडघर ७६) बारे बु. ७७) नांद ७८) पळसोशी ७९) साळवडे ८०) गृहिणी ८१) भांबवडे ८२) शिळीब ८३) डेहेण-कोंडगाव ८४) पान्हवळ ८५) करंदी खुर्द ८६) वरोडी खुर्द ८७)  म्हाकोशी ८८) वरोडी डायमुख ८९) सोनवडी ९०) साळव  ९१) सांगवी-भोर ९२) कासुर्डी खेबा ९३) पाले ९४) रावडी ९५) दुर्गाडी ९६) सांगवी वेखो ९७) तेलवडी ९८) पांडे १००) पारवडी.

तालुक्यातील विविध गावातील सरपंच पदाचे इच्छुक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज झालेल्या सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी १० जागा, अनुसूचित जमातीसाठी ५ जागा, मागास प्रवर्ग ४१ जागा, आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी १०० जागा असे आरक्षण निश्चित करण्यात आले असुन त्यामध्ये अनेक जण आरक्षण सोडतीवर लक्ष ठेवून होते. सोडती दरम्यान अनेक इच्छुकांना मनासारखे आरक्षण मिळाले नाही म्हणून आरक्षण सोडतीतून काढता पाय घेतला, तर काही ठिकाणी ग्रामपंचायती आरक्षित झाल्याने इच्छुकांची मोठी गोची झाली आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!