महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाकडून 30 दिवसाचे वेळापत्रक जाहिर
पुणे : शनिवार 1 मार्च 2025 रोजी महानगर क्षेत्र प्राधिकरणाने महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी 30 दिवसांचे विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 मार्चपासून सुरू होणाऱ्या या मोहिमे अंतर्गत महामार्ग मोकळे करण्यासाठी विविध विभागांचा समन्वय साधला जाणार आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागांत पुढील 30 दिवसांत राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेली दुकाने, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सवे विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. यापुढील काळात वर्षातून 2 वेळा अशा प्रकाराच्या कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊनच बांधकामे करावीत असे आवाहन डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
वेळापत्रक
• 3 ते 10 मार्च
• पुणे-सोलापूर महामार्ग (हडपसर ते यवत व उरुळी कांचन ते शिंदवणे)
• पुणे-नाशिक महामार्ग (राजगुरुनगर),
• चांदणी चौक ते पौड
• 10 ते 20 मार्च
• पुणे-सातारा महामार्ग
• (नवले पूल ते सारोळे)
• 20 ते 2 एप्रिल
• सूस मार्ग
• हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट
• नवलाख उंब्रे ते चाकण
• हिंजवडी परिसर-माण
• तळेगाव-चाकण-शिक्रापूर
या बैठकीस अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, सहआयुक्त दीप्ती सूर्यवंशी-पाटील, अधीक्षक भूमी अभिलेखाच्या आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड मनपाचे शहर अभियंता मकरंद निकम, वाहतूक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर, पुणे शहर सहाय्यक पोलिस आयुक्त नंदिनी वग्याणी, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शंकर पाटील, मीनल पाटील, संतोष जाधव, बी. के. गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपाचे सह शहर अभियंता हरियाल नरेश, एमआयडीसीचे उपअभियंता प्रकाश पवार, पुणे मनपाचे उप अभियंता महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्पेश लहिवाल, एमआयडीसीचे एम. एस. भिंगारदिवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



