ताज्या घडामोडी

शेतकऱ्यानं पाठोपाठ लाडक्या बहिणीचाही महायुतीला दणका : थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


रविंद्र पाटोळे,
प्रतिनिधी.

श्रीरामपनगर : महायुती सरकार विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की महायुतीचे सरकार येताच  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील १५०० रुपये ऐवजी दर महिना २१०० अनुदान देऊ. पण निवडून सत्तेत येतात महायुतीने २१०० तर नाहीच दिले पण किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे १५०० रुपये अनुदानही बंद केले. याप्रकरणी लाडक्या बहिणी आता आक्रमक झाले असून त्यांनी श्रीरामनगरच्या पोलिस ठाण्यात त्यांनी सरकार विरोधात तक्रार दाखल करून दणका दिला आहे.

Advertisement

महायुती सरकार सतेत येऊन १०० दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढवले नाही महायुतीचे सरकार आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती, महायुती सरकार सतेत येऊन १०० दिवस होऊन गेले आह़ेत.

शेतकऱ्यांनी कर्जमाफी वरून दाखल केलेला तक्रारीनंतर आता लाडक्या बहिणींनी महायुती सरकार विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान श्रीरामपूर पोलिसांनी तक्रारी अर्ज दाखल करून घेतला असून पुढे कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!