ताज्या घडामोडी

रिपब्लिकन सेनेचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न


 

मुंबई : न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करणाऱ्या रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, आपल्या २७ वर्षांच्या संघर्षमय आणि यशस्वी प्रवासाचा अभिमान बाळगत संघटनेने यंदा २८व्या वर्षात भव्य प्रवेश केला.

राज्यातील माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला विशेष हजेरी लावून रिपब्लिकन सेनेला पुढील वाटचालीत ठाम सहकार्याचा विश्वास दिला. भीमशक्ती आणि शिवशक्ती या परिवर्तनवादी प्रवाहांच्या ऐक्याला त्यांच्या उपस्थितीमुळे नवे बळ मिळाल्याचे नेत्यांनी यावेळी प्रतिपादन केले.

२७ वर्षांची संघर्षमय वाटचाल २१ नोव्हेंबर १९९८ रोजी रुजलेल्या या विचारांच्या वटवृक्षाने सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी कार्यातून वंचित घटकांमध्ये सकारात्मक परिवर्तनाची चळवळ उभी केली. राजकीय पक्ष म्हणून गेल्या अकरा वर्षांत रिपब्लिकन सेनेने इंदू मिल संघर्षासह अनेक संवेदनशील प्रश्नांवर प्रभावी लढे उभारले आहेत.

Advertisement

इंदू मिल व PES चे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीसाठी इंदू मिल प्रकल्प हा रिपब्लिकन सेनेच्या जनआंदोलनाचा कणा ठरला असून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या स्वप्नपूर्तीकडे पुढे वाटचाल सुरू आहे.

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘द पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) ला नवी दिशा देत शिक्षणाच्या माध्यमातून वंचितांचे सबलीकरण हा संघटनेचा प्रमुख ध्यास ठेवल्याचे यावेळी ठळकपणे नमूद करण्यात आले. येणाऱ्या नवीन वर्षाचा दृढनिश्चयनव्या वर्षाच्या उंबरठ्यावर रिपब्लिकन सेनेने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, शिक्षण, समता आणि स्वाभिमान पोहोचवण्याचा संकल्प यावेळी केला.

वर्धापन दिन कार्यक्रमास उत्स्फूर्त उपस्थिती लावणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानत अधिक सक्षम आणि न्याय्य समाजनिर्मितीसाठी जिद्द, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!