ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १ हजार जागांसाठी नोकरभरती करणार : डॉ. दिगंबर दुर्गाडे


स्वप्निल देशपांडे,
प्रतिनिधी.

पुणे : दि. ३ मे २०२५ (शनिवार) पुणे जिल्हा बँकेत काही वर्षापूर्वी नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र त्या वेळी आगामी बँकेच्या निवडणुका व त्या  निवडणुका होण्यास झालेला विलंब यांमुळे निवडणुका प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यानंतर नूतन संचालक मंडळाने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यास सहकार विभागाने स्थगिती दिली होती, व याच दरम्यान महाराष्ट्र शासनाने सहकारी संस्थांसाठी नोकरभरती करायची असेल, तर त्यासाठी पॅनेल निश्चित केले होते. परंतु आता सहकार विभागाने नोकरभरती प्रक्रियास मंजुरी दिली आहे.

Advertisement

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे ९०० ते १ हजार जागांसाठी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार शासकीय पॅनेलवर संस्थेच्या मार्फतच नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नोकरभरतीची पुर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येईल, येत्या २० ते २५ दिवसांत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

पॅनेलवरील संस्थांकडून नोकरभरती करण्याचे बंधन शासनाने घातले. यासंदर्भात बँकेने सहकार विभागाने यासंदर्भातील अभिप्राय मागविला असता, सहकार विभागानेसुद्धा पॅनेलवरील संस्थेमार्फतच भरती प्रक्रिया राबवावी असे नमूद केले. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या अधिकृत संस्थेमार्फतच नोकरभरतीची प्रक्रिया राबवणार असुन लवकरच नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. अशी माहिती बँकेच्या संचालक मंडळ व पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!