ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र बनेश्वर ते नसरापूर रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा : भाविक भक्तांचा व ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा


नसरापूर : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर ते नसरापूर रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात ९ एप्रिल रोजी कलेक्टर कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन केले होते. त्या वेळी प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन मागे घेतले होते,  २ मे रोजी रस्त्याचे काम सुरू केले जाईल. मात्र आज तारीख २ मे असून देखील रस्त्याच्या कामास कुठलाही प्रारंभ झालेला नाही, तसेच प्रशासनाच्या वतीने कोणतीही हालचालही दिसून आलेली नाही.

या प्रकारामुळे नसरापूरसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. बनेश्वर ट्रस्टच्या कार्यकारिणीने व समस्त ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अशी माहिती दिली की, जर प्रशासनाने त्वरित रस्त्याच्या कामास प्रारंभ केला नाही, तर नजीकच्या काळात पुणे-सातारा महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

Advertisement

भोर तालुक्यातील आमदार, खासदार व अन्य सर्वच लोकप्रतिनिधींनी या तीर्थक्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी आपल्या तालुक्यात आणला पाहिजे,या देवस्थानच्या नावाखाली आपल्या भागातील लोकांचा, गावांचा विकास होऊ शकतो, हे ओळखून दर्जेदार व सुसज्ज असा रस्ता बनवला पाहिजे, एकदा का एखाद्या भागात दळणवळणाची साधने दर्जेदार झाली, तर पर्यटनातून विकास अपोआप चालत येतो, याचे उत्तम उदाहरण सध्या रस्त्यांवर प्रचंड झपाटयाने हॉटेल सह जागोजागी अनेक लहान-मोठे  व्यवसाय उदयास आले आहेत व एक रस्ता चांगला दर्जेदार असेल, तर परिसराचा विकास किती झपाट्याने होऊ शकतो, हे आपण पाहतोय.

याउलट सध्या भोर तालुक्याचे हक्काचे देवस्थान असून नसरापूर- बनेश्वर हा रस्ता अंत्यत निसर्गरम्य मार्ग असताना रस्त्यांची प्रचंड दुरवस्था असल्याने विकास आराखड्यातील विकास कागदावरच राहिला आहे.

प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही हा संविधानिक मार्ग अवलंबत आहोत, जर काम लवकर सुरू झाले नाही, तर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, ट्रस्टचे पदाधिकारी आणि सर्व सभासद महामार्गावर उतरतील असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

हा रस्ता धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, अनेक भाविक दररोज यावरून प्रवास करतात. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे, अशी जोरदार मागणी सध्या परिसरातून होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!