भारतीय नौदलामध्ये भरती होण्यासाठी जिल्हा परिषद शाळा सारोळा येथे ” माझा खरा हिरो ” उपक्रम
सारोळा : दि. 28/06/2024 (शुक्रवार) “माझा खरा हिरो” या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा सारोळा. ता,भोर,जि.पुणे. येथील शाळेमध्ये सारोळा गावातील भारतीय नौदल अधिकारी शुभम शेरे यांना आमंत्रित केले होते.
Indian Navy भारतीय नौदला मध्ये करिअर करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत. कोणते शिक्षण घ्यावे, अभ्यास कसा करावा, याविषयी मुलांना नेव्ही अधिकारी शुभम शेरे यांनी सुंदर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित लहान मुले आणि मुली यांनी प्रश्नांचा भडीमार केला.
भारतीय नौदलात नोकरी करण्याचं अनेक तरुण तरुणीचं स्वप्नं असतं. नौदल ही देशाच्या संरक्षणासाठी नेहमी सज्ज असते, भ नौदलाचे काम देशाला सागरी हल्ल्यांपासून सुरक्षा प्रदान करणे आहे. तसेच समुद्राच्या सीमेवर शत्रू आणि बाहेरील लोकांवर नजर ठेवणे आणि कोणत्याही हल्ल्याला उत्तर देणे. भारतीय नौदल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे बलवान नौदल मानले जाते. भारतीय नौदलाकडे सध्या 290 हून अधिक जहाजे आहेत. नौदलात काम करणाऱ्या लोकांना अनेक भत्ते, पेन्शन, राहण्याची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मिळतात. भारतीय नौदल जेथे कायमस्वरूपी नोकरी असते.
यामध्ये विविध क्षेत्रातील व्यावसायिक, उच्चपदस्थ व्यक्ती, आधुनिक शेतकरी इत्यादींना आमंत्रित करतात. यात आपले शिक्षण, बालपण, अभ्यास, शालेय जीवन एकंदरीत ते कसे घडले या सर्वांची माहिती शाळेतील मुलांना मिळावी जेणेकरून चिमुकल्याणमध्येही एक प्रेरणा निर्माण होईल. या हिरोंच्या अनुभवांच्या शिदोरीचा फायदा करून ही मुलेही भविष्यामध्ये त्यांचे आयुष्य यशस्वी करू शकतील. यातून चिमुकली मुले उच्च पदस्थ अधिकारी होऊन त्यांचे आणि सारोळा गावाचे नाव मोठे करतील, यासाठी हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित केला जातो.
या कार्यक्रमासाठी सारोळे गावचे मुख्याध्यापक विजयकुमार थोपटे, उपशिक्षक संदीप सावंत, सहशिक्षिका जया कांचन, छाया हिंगे, वंदना कोरडे, अर्चना वानखेडे, जयश्री शिर्के, कांचन थोपटे उपस्थित होते.




