CBSE (सीबीएसई) कडून दहावी आणि बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
पुणे ; CBSE सीबीएसईच्या परिपत्रकानुसार भारतात जवळपास दरवर्षी 42 ते 45 लाख विद्यार्थी या परीक्षांना बसत असतात, यावर्षी साधारणपणे 45 लाख विद्यार्थी बसणार आहेत, आपल्या देशातील 2024 विषयांसह विदेशातील 26 देशात ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. बोर्डानं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. की हे वेळापत्रक संभाव्य असुन शाळांकडून विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रस्तुत केल्यानंतर अंतिम वेळापत्रक जारी केलं जाणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डानं 2026 साठी दहावी आणि बारावीच्या परिक्षा दोन टप्प्यात घेण्याचे निश्चित केले असुन, केंद्रीय बोर्डाच्या अधिकृत नोटीसनुसार पहिल्या टप्प्यातील 17 फेब्रुवारी 2026 ला परीक्षा सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 15 जुलै 2026 ला संपेल. या वेळी मुख्य परीक्षेसह विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्रीय बोर्डानं संभाव्य वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले आहे. परीक्षांची तयारी सुरु करण्यासाठी आणि प्रात्याक्षिक परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.




