राजगड पोलिसांचा मटका व जुगार आड्ड्यावर छापा : 3 जणांना अटक
खेडशिवापुर : दि. 27/06/2024 रोजी 20.32 कोंढणपुर फाटा,ब्रिजच्या खाली अशोक बाबुराव घाटे वय 62 वर्ष रा.वेळु ता. भोर,जि.पुणे.हा लोकांकडुन आकडे वर पैसे लावुन घेऊन स्वतःच्या तसेच पंकज कोंडे व त्याचे चुलते राजेंद्र किसन कोंडे दोघेही रा. खेडशिवापुर ता.हवेली,जि.पुणे यांच्य फायद्यासाठी कल्याण,MDC,मिलन डे नावाचा मटका खेळवत असताना त्यांच्याकडुन रोख रक्कम 1) 8,900/- रु.त्यात 500/- रू दराच्या 8 नोटा, 200/- रु दराच्या 5 नोटा, 100/- रू. दराच्या 22 नोटा, 50/- रू. दराच्या 30 नोटा, व 20/- रू. दराच्या 10 नोटा असे एकूण 2) 900/-रु. एक काळे रंगाचा नोकीया कंपनीचा छोटा मोबाईल त्यांमध्ये आयडीया कंपनीचे सिम कार्ड नंबर 8888102072 जु.वा.कि.अं.3) 00-00 एक हिंमत सागर नांव असलेला मटक्याचा चार्ट तसेच KO 27/6 असे लिहलेले कागदाच्या तीन चिठ्ठ्या तसेच KO 27/6 असे लिहलेले कागदाच्या एक चिट्ठी आशा एकुण 4 चिठ्ठ्या त्यावर आकडे लिहुन समोर पैसे दर्शवलेल्या तीन चिठ्ठ्या, वी घाटे असे लिहलेले कि.अं. 4) 05-00 एक निळे काडी चा बॉल पेन चालु स्थितीत येणे प्रमाणे मटक्याचे साहीत्य असे एकुण रक्कम 9,805/- रू. चा माल मिळून आला म्हणून त्यांचे विरूद्र मुंबई जुगार अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे सरकार तर्फे कायदेशीर कारवाई फिर्यादी अजित बाबासो माने,पो. हवालदार ब.न.1965 देण्यात आली.दाखल अंमलदार पो.हवालदार गायकवाड ब नं 1907 प्रभारी अधिकारी राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पो.हवालदार कोल्हे ब नं 1860 पुढील तपास करत आहेत.


