क्राईम

ढाब्यावर दारू पिताना तीन मित्रांच्या वादात एकाचा संशयास्पद मृत्यू


भोर,प्रतिनिधी.                                                               सुनिल सावंत

भोर :आंबवडे ता.भोर येथे ढाब्यावर मित्रांबरोबर दारू पित असताना वाद निर्माण होऊन झालेल्या भांडणात एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि,. 22 जुलै (सोमवारी) सायंकाळी घडली.  मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव तुषार शिनगारे (वय 39 वर्ष) रा.कर्नवडे,ता.भोर असे आहे.

मयत तुषार शिनगारे व त्याचे दोन मित्र हे आंबवडे गावातील एका ढाब्यावर दारू पित बसले होते. दारू पित असताना तुषार आणि त्याच्या दोन मित्रांमध्ये वाद निर्माण झाला वादाचे रुपांतर हाणामारी मध्ये झाले आणि या हाणामारीत तुषारचा मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी स्थानिक ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहे.

Advertisement

सदर घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत_ शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठविला. तूषारच्या मृत्यूमध्ये घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून भोर पोलिसांनी दारू पिणाऱ्या इतर दोघांना ही ताब्यात घेतले असुन, तुषारच्या मृतदेहावर कोठेही जखमा दिसुन येत नाहीत, असे प्रथमदर्शनी भोर पोलिसांनी सांगितले असून पुढील तपास भोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहुल मखरे करीत आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!