क्राईम

घर फोडुन 7,34,000 रू.किंमतीचे 10 तोळे सोन्याच्या दागिन्याची चोरी


 

नसरापूर : धायरेश्वर सोसायटी नसरापूर ता.भोर,जि.पुणे. येथील फ्लॅट बंद असल्याने त्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी 10 तोळे 7,34,000 रु. किमतीचे सोने चोरून नेले आहे. या प्रकरणी खंडू सिताराम मोहिते (वय 53 वर्ष मुळ गाव वाठार ता. फलटण जि. सातारा) सद्या राहणार धायरेश्वर सोसायटी नसरापूर यांनी राजगड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नसरापूर येथील धायरेश्वर सोसायटी मधील फ्लॅट नं.103 चे दरवाजाचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून फ्लॅट मध्ये प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने 7,34,000 रु. किमतीचा ऐवज घरफोडी करून अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

Advertisement

खंडू मोहिते हे नागपूर येथे एअरपोर्टला कामाला असून रविवारी सुट्टी घेऊन गावाला आल्यानंतर त्यांनी भोरला आजीला भेटण्यासाठी भाऊ आणि आईला घेऊन गेले होते.

त्यावेळी त्यांचे वडील हे कामावर गेले असताना, घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून चोरी केली आहे. सासवड येथील दूरक्षेत्राचे पोलीस एस.डी. पी.ओ, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.स.ई. पवार करीत आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!