राजकीय

अजय कांबळे यांच्या याचिकेवर विभागीय आयुक्तांचा कठोर निर्णय; न्हावी 322 च्या सरपंचावर अपात्रतेची कारवाई


  •  भोर : दि.२७/०६/२०२४ (गुरुवार) कापुरहोळ येथे हॉटेल राजवाडा मध्ये पत्रकार परिषद झाली, मौजे न्हावी ३२२ ता.भोर जि. पुणे २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. त्यामध्ये गणेश ज्ञानोबा सोनवणे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून बहुमतानं निवडून आले, ग्रामपंचायत न्हावी ३२२ मध्ये सरपंच म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी सरपंच पदाच्या कर्तव्यात कसूर व बेकायदेशीर कामे केल्यामुळे त्यांच्या विरोधात श्री अजय रुपचंद कांबळे उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका यांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार कामात अनियमिता केल्यामुळे व पदाचा दुरुउपयोग केल्यामुळे सरपंच व सदस्य पद बाद करावे म्हणून वकील दिगंबर खोपडे यांच्या वतीने प्रकरण दाखल केले. त्यामध्ये त्यांनी १५ वा वित्त आयोगाचा निधी हा ग्रामसभेची मंजुरी न घेता परस्पर खर्च करणे, तसेच मासिक सभा न घेणे, मनमानी कारभार करणे, ग्रामपंचायत मधील रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे, शासकीय प्लॉट परस्पर विक्री करणे, बनावट ८ अ उतारे तयार करुन देणे, खोटे मृत्यू दाखले तयार करणे, ग्रामपंचायत कामांमध्ये भ्रष्टाचार करणे असे अनेक मुद्दे त्यांच्या विरोधात होते,म्हणुन त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते. त्यामध्ये मा. विभागीय आयुक्त पुणे यांनी सबंधित मुख्यकार्यकारी अधिकरी पुणे जि.प. पुणे व गटविकास अधिकारी भोर यांचा सविस्तर चौकशी अहवाल मागून घेण्यात आली होता. नंतर अर्जदार व जबाब देणार यांना सुनावणी वेळी लेखी व तोंडी म्हणणे सादर करण्याची समान संधी देण्यात आली. सुनावणी नंतर अर्जदार यांनी हे सिद्ध केले कि सरपंच गणेश झनोबा सोनवणे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार कामात पारदर्शकता न ठेवता, सरपंच नावा पुरते कामकाज केले, व कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्या विरोधात ठेवण्यात आलेले दोषारोप पत्र हे सुनावणी वेळी अर्जदार यांच्या वतीने वकील दिगंबर खोपडे व वैभव खोपडे यांनी सुनावणी मध्ये सिद्ध केले कि गणेश ज्ञानोबा सोनावणे यांनी सरपंच व सदस्य पदाचा दुरुउपयोग आणि कर्तव्यात कसूर केल्यामुळे मा.आयुक्त यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्य पदावरून कमी करण्यात आले.                                             याप्रसंगी रमेश गणगे (बळीराजा शेतकरी संघटना संपर्क प्रमुख महाराष्ट्र), संतोष मोहिते (मा.अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, भोर ता.), संतोष पारठे, गणपत पारठे, मिलिंद तारु, जगन्नाथ सपकाळ, विजय गायकवाड, लव्हाजी मालुसरे, रामचंद्र कोंढाळकर, बाळासाहेब पवार तसेच आदी उपस्थित होते.
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!