राजकीय

भोर विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील बंडाळीचे ग्रहण सुटणार ?


 

भोर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले असुन या बंडोबांना पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीने शांत करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर (सोमवार) असल्याने याच दिवशी या मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार असून मंगळवार दि. 5 नोव्हेंबर पासून प्रचाराची औपचारीकपणे सुरुवात होणार आहे, 20 नोव्हेंबरला मतदान होणार असुन या विधानसभा रणसंग्रामात कोण “बाजी’ मारणार हे शनिवार दि. 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार असल्याने आता 22 दिवस “कळ’ काढावी लागणार आहे.

Advertisement

हा मतदार संघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असून या मतदारसंघात भोर-राजगड (वेल्हे)-मुळशी या तालुक्यांचा समावेश होतो.तसेच या मतदासंघात विजयी चौकार मारण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे तयार असुन त्यांचा विजयी चौकार रोखण्यासाठी महायुतीचे शंकर मांडेकर, परंपरेप्रमाणे त्यांचे राजकीय विरोधक अपक्ष उमेदवार कुलदिपतात्या कोंडे, दुसरे अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील सज्ज झाले आहेत, दरम्यान महायुतीत आतातरी “बंडाळी” झाली असली तरी सोमवारी दि. 4 नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे बंडाळीचे “ग्रहण’ महायुतीचे वरिष्ठांना सोडवण्यात यश येईल ? महायुती- महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार की चौरंगी लढत रंगणार ? हे 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!