ससून रुग्णालयात भ्रष्टाचार ; दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले
पुणे : ससून रुग्णालय हे या-ना-त्या कारणांनी अधुनमधून गैरप्रकारांसाठी चर्चेत येत असते, अशाच एका गैरप्रकारासाठी ते पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या रुग्णालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज प्रकरणामुळे ससून रुग्णालय चर्चेत आले होते.
महाविद्यालयाच्या फर्निचर देणाऱ्या पुरवठादाराकडे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना एक लाख रुपयांची लाच मागितली होती, याची खबर लाचलुचपत विभागाला गुप्तचर विभागातील सदस्यानी दिली असता, त्यानी सापळा रचुन या दोन्हीही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडुन आपले कर्तव्य बजावले.
चौकशीतुन महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचर पुरवठादाराचे दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचे म्हटले जात आहे. पुढील तपास वरिष्ट अधिकारी करत आहेत.




