ताज्या घडामोडी

भरधाव एसटी बसची दुचाकीला समोरासमोर धडक ! एक गंभीर जखमी !! राजगड पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


कापूरहोळ : भोर तालुक्यातील सावरदरे गावाच्या हद्दीत सारोळा-वीर मार्गावर मंगळवारी (दि. 14) सकाळी झालेल्या एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात दोन युवक जखमी झाले असून, त्यापैकी एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरदरे येथील परभळ वॉशिंग सेंटरजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. एसटी बस क्रमांक एमएच 06 एस 8298 चे चालक सचिन नारायण धनावडे (वय 40) यांनी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे बस चालवत समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच 12 एचडब्ल्यू 5534 ला जोरदार धडक दिली.

Advertisement

या अपघातात दुचाकीवरील शेखर भगवान बिडकर (वय 37) यांना मांडीला किरकोळ दुखापत झाली, तर त्यांचे मित्र सागर राजेंद्र भोसले यांचा उजवा पाय मांडीजवळ फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी शेखर बिडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार मदने अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!