ताज्या घडामोडी

भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे मंगळवारचा आठवडे बाजार रद्द ! गुरुवारी भरणार : गजानन शिंदे (नगरपालिका मुख्याधिकारी)


 

भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी, दि. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमुळे भोरचा पारंपरिक आठवडा बाजार या वेळी रद्द करण्यात आला आहे. नगरपालिका मुख्याधिकारी गजानन शिंदेंनी याबाबत माहिती दिली की बाजार गुरुवारी दि. ४ डिसेंबरला भरवण्यात येणार आहे.

Advertisement

भोरचा आठवडा बाजार वर्षानुवर्षे मंगळवारी भरत असला तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि राजकीय शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पुरंदर, लोणंद, फलटण, बारामती, वाई, खांदाळा यांसह शेकडो किलोमीटर दूरून आलेले व्यापारी व ग्राहक या बाजारात गर्दी करतात आणि तेथे मोठा आर्थिक व्यवहार होतो.

भोर नगरपालिका निवडणूकीच्या दिवशी नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, म्हणून मंगळवारी बाजार रद्द करून तो गुरुवारी भरविण्याचा निर्णय झाला आहे. मुख्याधिकारी शिंदेंनी नागरिक व व्यापारी वर्गाला शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!