राजगड सहकारी साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न ! कारखान्याची निर्मिती व व्यवस्थापन पाहण्यासाठी राजगड आयडॉल ठरणार : मा.आमदार संग्राम थोपटे
कापूरहोळ : दि. २५ सप्टेंबर (गुरुवार) रोजी दुपारी २:०० वाजता राजगड सहकारी साखर कारखान्याची ३५ वी आर्थिक वार्षिक सर्वसाधारण सभा ( सन २०२४-२०२५ ) कारखान्याचे चेअरमन, मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षखाली व सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवीन प्रकल्प उभारणीकरीता ४६७ कोटी रूपये मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे व संपुर्ण मंत्रीमंडळाचे संग्राम थोपटेनी विशेष आभार मानले, यावेळी गाळप ३५०० मॅट्रिक टनाहुन ४९५० मॅट्रिक टनापर्यंत कऱण्यात येईल, तसेचडिसलरी प्रकल्प, गॅस निर्मिती, विज निर्मिती, इथेनॉल निर्मिती, असे प्रकल्प राबविण्यात येणार असुन तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
भविष्यात राज्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याची निर्मिती व व्यवस्थापन पाहण्यासाठी राजगड कारखाना आयडॉल ठरेल व लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करणार आहे. तसेच तालुक्याच्या विकासाचा प्रश्नांवरही काम करून विकास साधणार आहे.या सभेमध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील ताळेबंदपत्रक, नफा-तोटा पत्रक, ऑडिट मेमो आदी तसेच अनेक विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते, त्या सर्व विषयांना सभेत मान्यता दिली.
शेतकरी व सभासदांनी आपला ऊस आपल्याच राजगड कारखान्याला देऊन कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दीष्ट पुर्ण होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,भविष्यात AI (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग ऊस शेतीमध्ये करुन ऊसाचे उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊस विकास योजनेमध्ये सभासदांनी सहभाग घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
त्यावेळी राजगड कारखान्यांचे उपाध्यक्ष पोपटराव सुके, संचालक के.डी.सोनवणे,शिवाजी कोंडे, उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, अशोक शेलार,प्रताप शिळीमकर,सुरेखा निगडे, शोभा जाधव, सुधीर खोपडे,अरविंद सोंडकर,पृथ्वीराज थोपटे, शैलेश सोनवणे, दत्तात्रय बाठे, सोमनाथ सोमाणी, नरेश चव्हाण,बाळासाहेब गरुड,अभिषेक येलगुडे, दिनकरराव सरपाले,नाना राऊत, अतुल किंद्रे, हे मान्यवर उपस्थित होते.




