भोर तालुक्यातील रांझे गावात तलाठ्याला 20 हजाराची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले
भोर : दि. 21/8/24 (बुधवार) रांझे,ता.भोर,जि.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांकडून पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व भोर तालुक्यातील रांझे गावातील तलाठी सुधीर तेलंग (वय- 57 वर्ष) यांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार यांनी रांझे गावात 20 गुंठे जागा खरेदी केली होती. सदर जागेची सातबारा उता-याची नोंद करण्यासाठी तक्रारदार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत होते, तलाठी यांनी तक्रारदारास प्रत्येकी गुंठा 1 हजार रुपयाची मागणी केली होती, म्हणजे 20 हजार रुपयाची लाचच मागितली,शेवटी रोज-रोजच्या त्रासाला कंटाळून त्यांनी सुधीर तेलंग यांच्या 20 हजार रुपयांची मागणी मान्य करून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे तक्रार केली.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सुधीर तेलंग यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी पंचासमक्ष तडजोडी अंती 20,000/- रुपयांची लाच मागणी करून, लोकसेवक तलाठी सुधीर तेलंग यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये 20,000/- लाब रक्कम पंचासमक्ष स्विकारले असता त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डी. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजेंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर की व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे. अँन्टी करप्शन ब्यूरो, पुणे दुरध्वनी क्रमांक – 02026122134, 26132802, 26050423. व्हाट्सअप नंबर – 9930997700




