ताज्या घडामोडी

ओम कोचिंगचे विद्यार्थी ठरले भोरची शान ! NEET, JEE, MHT-CET मध्ये यशस्वी घोडदौड !! गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न


भोर : भोर येथील ओम कोचिंग क्लासेस फॉर करिअर डेव्हलपमेंट यांच्या वतीने सन २०२६ मधील NEET, JEE, MHT-CET तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दत्तात्रय इंगवले सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ओम शिंदे (एमबीबीएस, उपजिल्हा रुग्णालय, भोर), आशिष गुजर (एसटीआय), विनोद बदक (पोलीस निरीक्षक, लोणावळा-खंडाळा), कुंभार सर (आर. आर. विद्यालय, भोर) तसेच अविनाश पाटील (नागेश्वर विद्यालय, आंबवडे) उपस्थित होते. संस्थेचे संचालक परमेश्वर कोठुळे सर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या यशामागील मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत यादव सर यांनी केले.

Advertisement

यावेळी NEET परीक्षेत समृद्धी बाळासाहेब गायकवाड हिने ५५९ गुण, स्वराज संतोष खंडाळे याने ५५३ गुण, तर आविष्कार प्रमोद कापरे याने ५१८ गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळविले. JEE परीक्षेत सुजल दीपक रायकर (९४.७९ पर्सेंटाइल), प्रथमेश विजय साळवे (९३.५४ पर्सेंटाइल) आणि समर्थ सोमनाथ कुंभार (९३.११ पर्सेंटाइल) यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. MHT-CET (PCM) गटात पुरुषोत्तम संतोष इंगवले, समर्थ कुंभार व सुजल रायकर, तर PCB गटात स्वराज खंडाळे, तन्वी विलास गोळे आणि आविष्कार कापरे यांनी उच्च पर्सेंटाइल मिळवत संस्थेचा नावलौकिक उंचावला.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. पालकांनी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती, वैयक्तिक मार्गदर्शन आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांचे कौतुक केले. “गुणवंतांचा सन्मान म्हणजे नव्या यशस्वी पिढीला प्रेरणा देणारा उत्सव” असा संदेश देत कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!