ताज्या घडामोडी

ग्राहक बनून आल्या ! दागिने चोरून पसार झाल्या !! नसरापूरमधील पंडित ज्वेलर्समधील चोरी सीसीटीव्हीत कैद


नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर मुख्य बाजारपेठेत महिलांच्या टोळीने अत्यंत चलाखीने ८४ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. १३ मे रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास ‘पंडित ज्वेलर्स’ या दुकानात ही चोरी झाली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Advertisement

माहितीनुसार, पाच महिला आणि एक लहान मुलगा ग्राहक असल्याचे भासवत दुकानात आले. सुरुवातीला दोन महिला आणि मुलाने सोन्याचे दागिने पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर मागून आलेल्या तीन महिलांनी दुकानदारांचे लक्ष दुसरीकडे वळवले. नाकातील नथनी पाहण्याच्या बहाण्याने दागिन्यांच्या पाऊचचा हाताबदल करत टोळीने ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. काही वेळानंतर कोणतीही खरेदी न करता सर्वजण दुकानातून निघून गेले.

दुकानदार विनय पंडित यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. दरम्यान, राजगड पोलीस ठाणे नसरापूर बाहेर हलवल्यापासून बाजारपेठेतील पोलीस गस्त कमी झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाढत्या चोरी, घरफोड्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!