श्री शिवजी विद्यालय कापूरहोळ शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश
खेड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यामाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत श्री शिवजी विद्यालय कापूरहोळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळविले आहे.
श्री शिवजी विद्यालय कापूरहोळ शाळेचे विद्यार्थी
१४ वर्षाखालील वयोगट मुली कु. श्रुती तानाजी पांगारे, जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक, विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
१७ वर्षाखालील वयोगट, मुली. कु पूर्वा बबन मेमाणे, प्रथम क्रमांक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मनस्वी संदीप गिरे प्रथम क्रमांक विभागीय स्पर्धेसाठी निवड.मानसी यादव, तृतीय क्रमांकअसे मुलींनी घवघवीत यश संपादन केले आहे.
१९ वर्षाखालील वयोगट मुले. सिद्धेश बबन मेमाणे .आणि गोळे कुणाल सुभाष. प्रथम क्रमांक. विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
१९ वर्ष मुलीमध्ये कु सानिका विकास पांगारकर या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
यशस्वी विद्यार्थिनींचे सर्व स्तरावर कौतुक होत असुन श्री शिवाजी विद्यालय कापूरहोळ प्राचार्य श्री यादव सर, क्रीडा शिक्षक धेंडे सर व ज्युनियर विभाग, माध्यमिक विभाग, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे त्यांना योग्य मार्गदर्शन लाभले आहे.
प्राचार्य यादव सर यांनी सर्व विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन करुन त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




