ताज्या घडामोडी

१५ हजार द्या, हप्ता घ्या ! शासकीय योजनेवर भ्रष्टाचाराचा डाग !! घरकुल हप्त्यासाठी लाच स्वीकारताना ग्रामसेवकास अटक


भोर : भोर तालुक्यातील महुडे खोऱ्यात दि. १९ (मंगळवार) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले व अटक केली. या घटनेमुळे भोर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिंद व गवडी गावांचे ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे (रा. बारामती) यांनी एका घरकुल धारकाकडून घरकुल योजनेचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. संबंधित लाभार्थ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

Advertisement

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ग्रामसेवकांबाबत नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानुसार भोलावडे-शिंद रस्त्यावर ग्रामसेवक सालगुडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!