ताज्या घडामोडी

अजितदादांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भोरमध्ये शुक्रवारी शोकसभेचे आयोजन


भोर : समस्त भोरकर नागरिकांच्या वतीने  महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता यशवंत मंगल कार्यालय, मांढरदेवी रोड, भोर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेत तालुक्यातील व शहरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आजी-माजी आमदार-खासदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, सामाजिक संस्था (एन.जी.ओ.), पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अष्टपैलू नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अकाली निधनाने राज्याच्या विकासाच्या वाटेवर एक मोठा आधार गमावला आहे. समस्त भोरकरानी या शोकसभेद्वारे त्यांच्या योगदानाला उजागर करणार असल्याचे सांगितले.

शोकसभेत त्यांच्या जीवनकार्यावर भाष्य होणार असून, उपस्थितांकडून श्रद्धांजली अर्पण केली जाईल. भोर तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरणात या सभेचे विशेष महत्त्व आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती अपेक्षित असून, हे अजितदादांच्या वारशाचे स्मरण करणारे एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!