भोर तालुक्यातील किवत गावामधील जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
भोर : गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधत गुरुंच्या प्रती असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करत भोर तालुक्यातील किवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील शिक्षकांचा सन्मान करत गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमा हा दिवस भारतीय संस्कृतीत गुरुजनांचा आदर आणि सन्मान करण्याचा दिवस आहे, शाळेमध्ये देखील विद्याथ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ व पेन भेट देत गुरुजनांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकान विषयी आपले मनोगत व्यक्त केले व कृतज्ञता व्यक्त केली.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंकज चंदनशिव, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार वसंत मोरे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेनिमित्त डायरी व पेन भेट दिली. विद्यार्थी तसेच शाळा गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक करत असलेल्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. तसेच श्री स्वामी समर्थ ट्रस्ट किवत यांच्या मार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व विद्यार्थी, शिक्षकांना गुरुौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी किवत ग्रामपंचायत सरपंच तानाजी चंदनशिव, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष किशन चंदनशिव, पोलीस पाटील सचिन पवार, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम चंदनशिवे, खादी ग्रामोद्योग चेअरमन चंद्रकांत चंदनशिव तसेच गावातील तरूण कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.




