भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटामध्ये चंदकांत बाठेंचा होम-टू-होम जोरदार प्रचार ! नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर : भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराला वेग आला असून, राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार चंदकांत बाठे यांच्या होम-टू-होम प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
घराघरांत पोहोचून थेट मतदारांशी संवाद साधताना त्यांनी स्थानिक समस्या, विकासकामे, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण याबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनीही आपल्या अपेक्षा, समस्या व सूचना मोकळेपणाने मांडल्या. “काम करणारे, सर्वसामान्यांशी जोडलेले नेतृत्व हवे,” अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा प्रचारात सक्रिय सहभाग दिसून येत आहे. गावागावातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचाराला बळ मिळत असून, आगामी निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहे.
गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले बाठे यांनी विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजउपयुक्त अनेक उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या पत्नी सौ. सुनिता बाठे यांनी भोर पंचायत समितीच्या सभापतीपदावर असताना केलेली उत्कृष्ट कामगिरी ग्रामस्थांच्या मनात अजूनही ताज्या आहे.
तसेच, विघ्नहर्ता पतसंस्थेच्या मार्गाने अनेक उद्योजकांना आर्थिक पाठबळ देऊन घडवले असून, स्थानिक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे.ग्रामस्थ म्हणतात, “बाठे यांच्यासारखे कामगार नेतेच खऱ्या विकासाची हमी देतील.” या प्रचाराने मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, निवडणुकीत बाठे यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे.




