ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात खळबळ ! आईला ठार मारून घराला कुलूप !! दुसऱ्या दिवशी गुन्ह्याची कबुली


भोर : वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी येथे दारूच्या व्यसनातून मुलाने स्वतःच्या आईची लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेत बेबी काळू मालुसरे (वय ५२) यांचा मृत्यू झाला असून, समीर काळू मालुसरे (वय ३१) याला भोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालुसरे कुटुंबीयांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता होती. समीर दारूच्या आहारी गेल्याने आई त्याला वारंवार समजावत होती. ‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ या कारणावरून शुक्रवारी दोघांमध्ये वाद झाला होता.

Advertisement

सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बेबी मालुसरे झोपलेल्या असताना समीरने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर वार केला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने मृतदेह घरात ठेवून बाहेरून कुलूप लावले तसेच आई गावाला गेल्याचे सांगून प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी नशा उतरल्यावर समीरने चुलत भावाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय जाधव, विशाल मोरे, दीपक गायकवाड व हेमंत भिलारे पुढील तपास करीत आहेत. दारूच्या व्यसनातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!