RTE प्रवेश ” लकी ड्रॉ “ची पहिली यादी आज जाहीर
ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा RTE चा फॉर्म भरलेला आहे,त्या पालकांसाठी खुप मोठी आनंदाची बातमी आहे,मागील दोन ते तीन महिन्यापासून या निकालाची वाट पाहत असलेल्या पालकांची चिंता संपली आहे,
RTE नुसार दुर्बल व वंचित घटका करिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी दि. 7 जून रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी दि. 20 जुलै (शनिवार) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या पाल्याच्या (विद्यार्थांच्या) पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर दि. 22 जुलै (सोमवार) पासून एसएमएस येण्यास सुरुवात होणार आहे.
ज्या पालकांना प्रवेश मिळाल्याचा एसएमएस येईल,अशा पालकांना दि. 23 ते 31 जुलै या कालावधीत जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पुर्तता करुन पडताळणी समिती मार्फत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करुन घ्यावा.
पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आपल्या पाल्याच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन अर्ज क्रमांक टाकुन लकी ड्रॉ मध्ये नाव किंवा नाही याची खात्री करुन घ्यावी.




