सामाजिक

भोरमधील जनता बँकेचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न


भोर,प्रतिनिधी.

भोर : जनता सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी भोर शाखेतील व्यवस्थापकांनी गुरुवार दि. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. दुपारी ४.०० ते सायंकाळी ६.३० या वेळेत शिरेश्वर मंदिरा समोरील सौभाग्य मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, बँकेचे अध्यक्ष,रविंद्र हेजीब, उपाध्यक्षा सौ.अलका पेटकर, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.जगदीश कश्यप, शाखेचे संपर्क संचालक मंदार फाटक सदर कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाहक श्री.प्रवीणजी दबडघाव हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. यावेळी बँके तर्फे त्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्थानिक आमदार श्री. संग्राम थोपटे यांना काही कारणांमुळे कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही. त्यांचे वतीने त्यांचे सुपुत्र व शाखेतील खातेदार श्री.पृथ्वीराज थोपटे हे कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. बँकेच्या वतीने त्यांचाही सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक श्री महेश घोळ यांनी केले. त्यानंतर भोर व्यापारी संघटने तर्फे श्री. बंडूशेठ गुजराथी यांनी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शाखेचे संपर्क संचालक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर शाखेचे गार्डियन एक्झिक्युटिव्ह श्री. दिपक केळकर तसेच उपमहाव्यवस्थापक श्री. निलेश देशपांडे यांनी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर केलेल्या कार्यक्रमांची माहिती पीपीटी‌द्वारे उपस्थितां समोर सादर केली.

Advertisement

बँकेतर्फे अमृतसिद्धी तसेच अमृतवृद्धी या २ नवीन ठेव योजनांचा शुभारंभ शाखेचे मा.संपर्क संचालक मंदार फाटक यांचे हस्ते यावेळी करण्यात आला. शुभारंभाच्या दिवशी भोर शाखेतील ग्राहकांनी सदर योजनेत उघडलेल्या ठेवीं पैकी ३ ठेवीदार ग्राहकांना त्यांच्या ठेव पावत्या या वेळी सन्मानपूर्वक वितरीत करण्यात आल्या. मागील १५ दिवसांत शाखेने केलेल्या प्रयत्नां मधून २४ नवीन कर्ज खाती मिळवली. त्यापैकी ५ कर्जदारांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्ज रक्कमेच्या चेकचे यावेळी वितरण करण्यात आले.

बँकेचे ज्येष्ठ ग्राहक श्री बंडूशेठ गुजराथी, सौ.शैलजाताई सावंत व श्री.गोपीनाथ आगाशे यांनी ग्राहकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. त्याशिवाय उद्योजक व कारी गावचे सरपंच श्री. सतीश देबे यांनी देखील त्यांना बँकेकडून कर्ज मिळताना आलेल्या चांगल्या अनुभवाचे कथन केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जगदीश कश्यप यांनी त्याच प्रमाणे बँकेचे अध्यक्ष श्री.रविंद्र हेजीब यांनी उपस्थितां समोर आपले मनोगत व्यक्त केले. श्री. प्रवीणजी दबडघाव यांनी बँके बद्दलच्या त्याचप्रमाणे भोर मधील जुन्या आठवणी सांगून बँकेवर येथील जनतेचे असलेले प्रेम कथन केले.

शाखेचे संपर्क संचालक श्री.मंदार फाटक यांनी “आरोग्याची काळजी या विषयावर उपस्थितांना आपल्या भाषा शैलीत मार्गदर्शन केले. सोप्या-सोप्या गोष्टीतून आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबतचे उत्तम मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

सदर ” ग्राहक मेळाव्यात ” उच्च नेटवर्क असलेल्या, रिटेल ग्राहक, मध्यम लघु व सूक्ष्म उद्योजक, ज्येष्ठ नागरिक / निवृत्तीवेतन धारक, शेतकरी, तसेच बँकेकडून कर्ज घेतलेल्या व तत्परतेने परतफेड करणाऱ्या दुर्बल घटकातील कर्जदार, स्वयंसहाय्य बचत गटातील सभासद, रस्त्यावरील फेरीवाले, मुद्रा लोन, कर्जदार ग्राहक अशा जीवनाच्या विविध क्षेत्रातील ग्राहक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी भोर शाखेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक श्री प्रथमेश बोडस यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!