सामाजिक

गुरुपौर्णिमा निमित्त श्री क्षेत्र नारायणपूर मध्ये भाविकांची मांदियाळी


 

सासवड, प्रतिनिधी.                                                          सौरव जगताप.

पुरंदर : श्री क्षेत्र नारायणपूर, येथील प्रसिध्द असणारे एकमुखी  दत्त मंदिरात दि. 21/7/24 (रविवार) गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला, दिवसभर ‘दिगंबरा दिगंबरा’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. एकमुखी दत्त मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदा ही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त दत्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती, रंगी-बेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती, गुरुपौर्णिमेच्या उत्सव सोहळ्यास पहाटे 5 वाजल्यापासून सुरुवात झाली. पहाटे दत्त महाराजांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर काकडा आरती झाल्यावर मंदिर दत्तगुरुंच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले, दुपारी 12 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात होती.

Advertisement

गुरुपौर्णिमा निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरा मध्ये आयोजन करण्यात आले होते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या भाविक भक्तगणांच्या दर्शनासाठी लांबच-लांब रांगा दिसुन येत होत्या, यावर्षी दर वर्षी पेक्षा भाविकांची जादाच गर्दी पहावयास मिळाली, मंदिराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल दरवर्षी भक्तगणांची संख्या वाढतच आहे, येणाऱ्या भक्तगणांनी दत्तमंदिर देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला.

गुरुपौर्णिमाच्या आजच्या सोहळ्यास पहाटे पासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दत्त सेवेकरी यांनी भरपुर मेहनत घेतली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!