क्राईम

सासवडमध्ये पैशाच्या किरकोळ वादातून 36 वर्षीय तरूणाचा खुन


  • सोमनाथ कुंभार,
    सासवड.

सासवड  : मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका 36 वर्षीय तरुणाचा खून झाला आहे, सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं खून झालेल्या तरुणाच नाव आहे. तो सासवड मधील जेजुरी नाक्यावर राहणारा होता, याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून संदेश अवचरे आणि अवंतिका अवचरे यांना सासवड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement

संदेश अवचरे आणि अवंतिका अवचरे यांच्या बरोबर खुन झालेल्या तरुणाचा किरकोळ पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाला होता, या वादातूनच सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला आहे, अशी प्राथमिक माहिती स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!